Combing Operation : कोम्बिग ऑपरेशन दरम्यान पुण्यात सापडली हजारो काडतुसे

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) दरम्यान तब्बल 1105 काडतुसे सापडली आहेत. यातील 56 काडतूसे जिवंत तर 79 काडतुसं खराब निघाली आहेत, तर जवळपास 970 बुलेट देखील जप्त करण्यात आले आहेत. एका भंगार वाल्याचा दुकानातून ही कारवाई करण्यात आली. दिनेश कुमार कल्लू सिंग सरोजी असे अटक करण्यात आलेल्या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. खडक पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) दरम्यान पुणे पोलिसांना गुरुवार पेठेतील एका भंगार विक्री त्याच्या दुकानात काडतुसे ठेवली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. त्याच्या दुकानात इतका मोठ्या प्रमाणात काडतूसे सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या भंगार विक्री त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 15 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

PM Modi Dehu Visit : पंतप्रधान मोदी यांचे उद्या देहूत आगमन, राज्यभर हाय अलर्ट जारी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.