Pune News : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद

एमपीसी न्यूज  : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, स्वच्छतेच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच महानगरपालिकेशी संबंधित अन्य इतर विषयांवर नागरिकांशी थेट चर्चा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार ट्विटरद्वारे लाईव्ह संवाद साधणार आहेत.

आयुक्त विक्रम कुमार 4 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 3 ते 3.30 दरम्यान ट्विटरद्वारे पुणेकरांशी लाईव्ह संवाद साधणार आहेत. यामध्ये नागरिकांना त्यांच्या सूचना, प्रश्न, विचारण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लाईव्ह संवादाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या सूचना किंवा मते #आयुक्तांशी चर्चा किंवा #AskPMCCommissioner हा हॅशटॅग वापरून दुपारी दोन वाजेपर्यंत ट्विट करावेत, असे पुणे महानगरपालिकेने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.