PMPML : पीएमपीएमएलकडून माफक दरात प्रासंगिक करार बससेवा

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (PMPML) दिली जाणारी प्रासंगिक करार बससेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरीक, शाळा, महाविद्यालये यांच्या मागणीनुसार लग्न समारंभ, सहल व इतर कार्यक्रमांकरिता प्रासंगिक कराराने परिवहन महामंडळाच्या संचलन कार्यक्षेत्रापर्यंत ठराविक दराने बसेस देण्यात येतात.

सुरक्षित व सुखकर प्रवास, किफायतशीर दर ही पीएमपीएमएलच्या प्रासंगिक करार बससेवेची वैशिष्ट्ये आहेत. पीएमपीएमएल कडून प्रासंगिक करार बससेवेचे माफक दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

सोमवार ते शनिवार करिताचे दर

.क्र.तपशीलसीएनजी बसचे दर

(रूपयांत)

बसचे दर

(रूपयांत)

18 तासांकरीता जीएसटी सह8469/-9951/-
216 तासांकरीता जीएसटी सह16940/-19903/-
3प्रस्तावित दराच्या 50 टक्के याप्रमाणे सोडणे/आणणे

(एकेरी खेपा) जीएसटी सह

4234/-4975/-

 

रविवार करिताचे दर (PMPML)

.क्र.तपशीलसीएनजी बसचे दर

(रूपयांत)

बसचे दर

(रूपयांत)

18 तासांकरीता जीएसटी सह6352/-7463/-
216 तासांकरीता जीएसटी सह12705/-14927/-
3प्रस्तावित दराच्या 50 टक्के याप्रमाणे सोडणे/आणणे

(एकेरी खेपा) जीएसटी सह

3176/-3731/-

 

तरी पीएमपीएमएल च्या सुधारीत दरातील प्रासंगिक करार बससेवेचा लाभ सर्व शाळा, कॉलेज, नागरीक, खाजगी व आय.टी. कंपन्या, नोकरदार यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.