Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तीन कोटींचे सोने जप्त

विमानतळावरील स्वच्छतागृहात लपवले होती सोन्याची बिस्किटे

एमपीसी न्यूज – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल संचलनालय व पुणे सीमा शुल्क यांच्या संयुक्त कारवाईमधून एकूण  तब्बल तीन कोटींची एकूण 10 किलो 175 ग्रॅम वजनाची 86 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आज गुरुवारी (दि. 16) करण्यात आली.  

मिळालेल्या माहितीनुसार,  दुबईहून पुण्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी करुन आणण्यात येत असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती. त्यांनी विमानतळावरील सीमा शुल्क विभागाला याची कल्पना दिली़. त्यानुसार दुबईहून येणाऱ्या स्पाईसजेट विमानातील सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली़. अधिकाऱ्यांनी विमानतळावर सर्वत्र  तपासणी केली असता तेथील पुरुष स्वछतागृहमध्ये कचरा पेटीत (डस्टबीन) मध्ये मोबाईलच्या चार मोठ्या कव्हरमध्ये ही 86  सोन्याची बिस्कीटे ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले़. त्याचबरोबर 2 सोन्याची वेढणीही त्यात होती.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्पाइस जेटच्या दुबईहून पुण्यात आलेल्या एसजी 52 विमानातील प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या या सोन्याची किंमत एकूण 3 कोटी 9 लाख 34 हजार 675 एवढी आहे. प्रवाशाने विमानतळावर उतरल्यानंतर तेथील स्वच्छतागृहातील कचरा पेटीमध्ये ही 86 सोन्याची बिस्किटे टाकलेली आढळून आली आहेत़.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.