Sangvi News : उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे (Sangvi News) अज्ञात चोरट्याने तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे सहकार नगर पिंपळे गुरव येथे घडली.

नादन मिनियम जेम्स (वय 47, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PM Narendra Modi : भाजपचे एक नम्र आणि कष्टाळू नेते म्हणत गिरीश बापट यांना पंतप्रधान मोदीनी वाहिली श्रद्धांजली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा (Sangvi News) दरवाजा मंगळवारी पहाटे उघडा होता. उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने फिर्यादी, त्यांची पत्नी आणि सासू यांचे 22 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.