Today’s Horoscope 01 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार शुक्रवार …. ​दि​.  01 जानेवारी 2021

 

  • शुभाशुभ विचार -१४ नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष –ई. स. २०२१ प्रारंभ.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – २०.१५ पर्यंत पुष्य नंतर अश्लेषा.
  • चंद्र राशी – कर्क 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- मरून )

आज तुमचा फक्त ऐश आराम करण्याकडे कल राहील. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. सहकुटुंब चैन करून बच्चे कंपनीस खुश कराल.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. अथक मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरूच राहिल. आज एका महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)

आज आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.

कर्क – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. योग्य हितसंबंध निर्माण होतील. खर्चास आवर घालून पुरेशी बचत करता येईल. आज अति आक्रमकतेने कायद्याची चौकट मात्र मोडू नका.
 

सिंह – ( शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही महत्वाच्या चर्चेत अग्रेसर असाल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुती नेही भारावून जाल. काही फसव्या संधी चालून येतील हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे हिताचे नाही.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू आहे. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत.

तुळ – ( शुभ रंग- पांढरा)

नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. अर्धवट बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेगवान राहील. आत्मविश्‍वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

.

वृश्चिक – ( शुभ रंग- नारिंगी)

आज तुम्हाला महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा सहवास लाभेल. ध्येयपूर्ती कडे वेगाने वाटचाल होईल. कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

धनु – ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीला नशिबाची उत्तम साथ मिळेल.

मकर – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुम्ही इतरांच्या भानगडीत नाक खुपसाल. एखादा विवाह जुळण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज तुम्हाला पत्नीस दिलेली वचनही पाळावी लागणार आहेत. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो

कुंभ – ( शुभ रंग – गुलाबी)

व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. जीवलग मित्रांमध्ये ही आज काही वैचारिक मतभेद होतील. जोडीदाराकडून आज फार अपेक्षा नकोत.

मीन – ( शुभ रंग- पिस्ता)

कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.