Today’s Horoscope 03 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 03 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

03.10.2023

शुभाशुभ विचार- 18 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- पंचमी श्राद्ध.

राहू काळ – दुपारी 03.00  ते 4..30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – कृत्तिका 18.04 पर्यंत नंतर रोहिणी

चंद्र राशी – वृषभ.

————————————

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

आज प्रिय पाहुणे घरी पायधूळ झाडतील. नेतेमंडळी आज सभा गाजवतील. आवक पुरेशी असून गृहिणींना वाढत्या खर्चातही कपात करण्याची गरज भासणार नाही.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी )

आज तुम्ही कार्यक्षेत्रात अत्यंत सकारात्मकतेने प्रत्येक निर्णय घ्याल. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. जोडीदाराचे मन जपाल.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

आजचा दिवसच खर्चाचा असल्याने कंजूषणास लगाम घालावाच लागेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागणार आहेत. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाद नकोच.

कर्क (शुभ रंग- मोरपंखी )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून जे चिंताल तसेच होईल त्यामुळे शुभच चिंता. जिवलग मित्र आज तुमचा शब्द झेलतील. नवीन व्यवसायासाठी कर्ज मंजुरी होईल.

सिंह (शुभ रंग- तांबडा )

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील कदाचित त्यामुळे कुटुंबीयांची नाराजी पतकरावी लागेल.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हमखास यश मिळेल घरात एखादे धार्मिक कार्य करण्याची भेट आखाल. मन प्रसन्न राहील.

तूळ ( शुभ रंग- आकाशी )

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हातचे सोडून पळत्या मागे जाणे योग्य ठरणार नाही. कोणतेही धाडसाची कामे आज नकोत. आज ताकही फुंकुनच प्यावे.

वृश्चिक (शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

धनु- (शुभ रंग- सोनेरी )

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल.

कुंभ (शुभ रंग – निळा)

कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा आज तुमचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

मीन -(शुभ रंग – पांढरा)

शेजाऱ्यांशी क्षूल्लक कारणांनी झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर क्रोधावर लगान ठेवणे हिताचे राहील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.