Chinchwad : ‘त्या’ मंडळांवर दाखल होणार खटले

एमपीसी न्यूज – ध्वनिक्षेपकाचा (डीजे) धांगडधिंगा शहरातील 103 मंडळांना भोवणार (Chinchwad) आहे. पोलिसांनी मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या मंडळांच्या आवाजाचे रीडिंग नोंदवले आहे. त्यानुसार आता पोलिसांकडून याप्रकरणी खटले दाखल करण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवात रात्री बारा पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी सुरुवातीला (Chinchwad)पाच दिवस परवानगी दिली होती. त्यानंतर एक दिवस वाढवून ती सहा दिवस करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांकडून मंडपात तसेच मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात डीजे लावले जातात. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार आवजाची पातळी मर्यादित ठेवणे बंधनकारक असते.

PCMC : स्वच्छता मोहिमेमध्ये रिक्षाचालकांचाही सहभाग

शासनाने विविध क्षेत्रातील आवजाची मर्यादा निर्धारित केली आहे.  शांतता क्षेत्रात आवजाची (Chinchwad)मर्यादा दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल एवढी आहे. निवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाज चालतो. व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 65 डेसिबल आणि रात्री 55 डेसिबल एवढ्या आवाजाची मर्यादा आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल एवढ्या आवाजाची मर्यादा आहे.

Kasarwadi : शाळेकडून गाव समृद्धीकडे; कासारवाडी इंग्लिश स्कूलने राबविली स्वच्छता मोहीम

पिंपरी-चिंचवड शहरात दीड, तीन, पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी टप्प्याटप्प्यात गणेश विसर्जन झाले. काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. वाजत गाजत काढलेल्या या मिरवणुकांमधून ढोल पथकांकडून दणदणाट झाला. ठरवून दिलेल्या ध्वनीपातळी पेक्षा जास्त डेसीबलची नोंद झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यानुसार विसर्जन मार्गांवर स्थानिक पोलीस ठाण्याच्या अंमलदारांकडून नाॅइज लेव्हल (डेसीबल) मीटरवर ध्वनी पातळीची नोंद घेण्यात आली आहे.

पोलिसांनी घेतलेल्या रीडिंगची सहायक पोलीस आयुक्तांकडून चौकशी होईल. जे रीडिंग घेण्यात आले, ते कुठल्या भागात घेतले गेले. तिथे आवाजाची मर्यादा किती निश्चित केली आहे. शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची मते आणि आवाज पातळीचे उल्लंघन करणाऱ्यांची चौकशी करून सहायक पोलीस आयुक्तांकडून न्यायालयात फिर्यादी म्हणून खटले दाखल केले जाणार आहेत. यानुसार संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर खटले नोंदवले जाणार आहेत. यामध्ये संबंधितांवर दोन ते पाच लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.