Today’s Horoscope 04 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग… रविवार, दिनांक… 04 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ… चांगला दिवस.
  • आज विशेष… सामान्य दिवस.
  • राहूकाळ… सायंकाळी 04.30 ते 06.00
  • दिशा शूल….पश्चिमेस असेल.
  • नक्षत्र… अश्विनी 11.52 पर्यंत नंतर भरणी.
  • आजची चंद्र राशी… मेष. 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – भगवा)
तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. नेतेमंडळींची लोकप्रियता वाढेल.  भावनेच्या भरात कोणाला दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.


वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे आज जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांनी रोजगारासाठी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवायला हवी.

मिथुन – (शुभ रंग – मोतीया)
आज तुमचे मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढताच राहील. कुटुंबात आर्थिक सुबत्ता असून संततीकडून आज काही सुवार्ता येतील.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच अशा भ्रमात मुळीच राहू नका. आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. मित्रांना आज दुरूनच राम राम करा.

सिंह – (शुभ रंग – तांबडा)
आज तुम्ही फक्त कष्ट करीत राहा फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. तुम्हाला काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. आज प्रयत्नांती परमेश्वर.

कन्या – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागेल. गुंतवणूक करताना झटपट लाभाचा मोह टाळा. वैवाहिक जीवनात संध्याकाळी काही क्षुल्लक मतभेद संभवतात.

तूळ – (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्हाला काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज पत्नीचे मन मोडू नका.


वृश्चिक
– (शुभ रंग – आकाशी)
सगळी महत्त्वाची कामे आज दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. शत्रू मित्रांमध्ये लपले असण्याची शक्यता आहे त्यामुळे सतर्क रहा. कोणाकडून येणे असतील तर मागायला लाजू नका.

धनु – (शुभ रंग – मरून)
नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असेल तर चांगल्या संधी चालून येतील.  कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी मिळतील. गृहिणींचे गृह उद्योग तेजीत चालतील.

मकर – (शुभ रंग – पांढरा)
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमात हजेरी लावावी लागेल.


कुंभ
– (शुभ रंग – गुलाबी)
बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. सभा संमेलनात तुमचे वक्तृत्व प्रभावी होईल. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.

मीन – (शुभ रंग – जांभळा)
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. अती स्पष्टवक्तेपणा टाळा, कारण त्यामुळे काही आपलीच माणसे दुखावतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.