Today’s Horoscope 05 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 05 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

05.04.2023.

 शुभाशुभ विचार- 09 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.  आजचे नक्षत्र – उत्तरा 11.23 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

व्यावसायिक मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकीनऊ येतील. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस अगत्याने करतील.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

कर्क (शुभ रंग- निळा.)

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. किरकोळ कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. अति सडेतोड बोलण्यास आवर घालायला हवा नाहीतर नाती दुरावतील.

सिंह (शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुणाचीही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. घाई गर्दीत घेतलेले काही निर्णय चुकतील. हातचे सोडून पळत्या मागे धावत राहू नका.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

एखादी हरवलेली वस्तू सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरा मोठ्यांच्या होला हो करून वादविवाद टाळा. आज सुसंवाद गरजेचा.

तूळ ( शुभ रंग- भगवा )

महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळा मागे धावण्याचा मोह होईल.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या आज दुर्लक्षित होतील.

धनु- (शुभ रंग- चंदेरी )

आज काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या दडपणात काम करावे लागेल. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्यावे. अतिव्यस्त दिवस.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे देव कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची साथ राहील.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी )

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असेल. कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणी मात्र अंगावर काढू नका. आज तुम्हाला विश्रांती ही आवश्यक आहे.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.