Donald Trump : पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

एमपीसी न्यूज -अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना (Donald Trump) पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी काल (4 एप्रिल) अटक करण्यात आली. गुन्हेगारी खटल्याच्या सुनावणीसाठी डोनाल्ड ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात पोहोचले होते.

ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीनं माजी राष्ट्रपतींविरुद्ध फौजदारी खटला चालवण्यास मंजुरी दिली होती.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी  ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टारपॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला तिच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीनं 130,000 यूएस डॉलर्सची रक्कम दिली.

Today’s Horoscope 05 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तसेच ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये, तसेच याप्रकरणा संबंधी कोणतीही वाच्यता करु नये असे सांगण्यात आले. हे आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आले आहे.

या  प्रकरणी  डोनाल्ड ट्रम्प हे न्यूयॉर्कमधील मैनहैटन कोर्टात हजर झाले . कोर्टात हजर होताच ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केली. अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या 30 पेक्षा जास्त गुन्ह्यांचे आरोप (Donald Trump)आहे.मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.