America Loves India: पीएम मोदींनी अमेरिकेला दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ट्रम्प म्हणाले…

America Loves India: PM Modi wishes Independence Day to America, Trump said जगातील सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या नेत्यांदरम्यान टि्वटरवरील चर्चेचे दोन्ही देशातील नागरिकांनी स्वागत केले.

एमपीसी न्यूज- अमेरिकेचा 244 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करत अमेरिका भारतावर प्रेम करतो, असे टि्वट केले आहे. अमेरिकेत 4 जुलैला स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.

पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त शनिवारी ट्रम्प आणि अमेरिकन नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी टि्वट केले होते. त्यांनी म्हटले होते की, या दिवशी ज्या स्वातंत्र्याचा जल्लोष केला जातो. आम्ही त्याचा सन्मान करतो. मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो.

ट्रम्प यांनी या टि्वटला उत्तर देताना त्यांनी पंतप्रधान मोदींचा मित्र असा उल्लेख करत अमेरिका भारतावर प्रेम करत असल्याचे म्हटले.


जगातील सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या नेत्यांदरम्यान टि्वटरवरील चर्चेचे दोन्ही देशातील नागरिकांनी स्वागत केले. हे टि्वट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

ट्रम्प व्हिक्टरी इंडियन-अमेरिकन फायनान्स समितीचे सहअध्यक्ष अल मासोन म्हणाले की, जग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिका आणि भारत, जगातील दोन मोठ्या लोकशाहीमधील अविश्वसनीय प्रेम आणि संबंधातील साक्ष बनत आहे.

लोकप्रिय आफ्रिकी-अमेरिकन गायक मेरी मिलबेन यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.