Mumbai: राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत चार लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप- छगन भुजबळ

Mumbai: Distribution of four lakh Shiv Bhojan thalis in the state till July says minister Chhagan Bhujbal शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता.

एमपीसी न्यूज- राज्यात 1 जुलै ते 4 जुलैपर्यंत 855 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 3 लाख 93 हजार 924 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलैमध्ये आतापर्यंत 3 लाख 93 हजार 924 असे एकूण दि.1 एप्रिल ते दि. 4 जुलै या कालावधीत 93 लाख 73 हजार 453 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये. यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता.

हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र, अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.