Maldive : भारताचा दणका! पंतप्रधान मोदींविरोधात विधान करणे मालदिवला पडले भारी; मंत्र्यांना बडतर्फ तर अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतरचा फोटो पोस्ट केल्यानंतर लक्षद्वीपच्या सौंदर्याची देशभर चर्चा होऊ लागल्यावर हे प्रकरण मालदीवपर्यंत (Maldive) पोहोचले. मालदीव इतके दुखावले गेले की, तेथील मंत्र्यांनी भारताबाबत चांगले-वाईट बोलण्याबरोबरच पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्यही केले. परंतु, यानंतर मालदीवलाच जास्तच त्रास सहन करावा लागला. कारण भारताने जगभरात लक्षद्वीपची प्रसिद्धी करून #BoycottMaldive हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला आणि मालदिवला यांचे आर्थिक परिणाम भोगावे लागले.

भारतातील पर्यटनासाठी मालदीवऐवजी लक्षद्वीपच्या समर्थनार्थ फोटोंपासून व्हिडिओंपर्यंतच्या पोस्ट टाकल्या जाऊ लागल्या. यामध्ये बॉलिवूड स्टार्सही मागे राहिले नाहीत. दुसरीकडे, भारताने या मुद्द्यावर मालदीवकडे अधिकृतपणे निषेध नोंदवला. पर्यटनातील नुकसानाबरोबरच मुत्सद्देगिरीतही वेढलेले पाहून मालदीवला गुडघे टेकावे लागले.  त्यांनी निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले.

मंत्र्यांना बडतर्फ करावे लागले

भारतीय उच्चायुक्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या ‘अपमानास्पद’ टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर रविवारी मालदीव सरकारने आपल्या तीन उपमंत्र्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली.  माल्शा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम मजीद या युवा मंत्रालयातील उपमंत्री यांना त्यांच्या पदांवरून निलंबित करण्यात आले आहे, असे मालदीवच्या स्थानिक माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

Maharashtra : संपूर्ण स्वच्छता मोहीम ही फक्त मोहीम नसून लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकारची भूमिका नाही – मालदिव सरकार 

याशिवाय, मालदीव सरकारने या टिप्पणीपासून स्वतःला दूर केले. ही खासदारांची वैयक्तिक मते असल्याचे सरकारने म्हटले आहे. या (टिप्पण्या) सरकारची अधिकृत भूमिका नाही, असेही सरकारने म्हटले आहे.

भारत आणि मालदिवचे मैत्रीपूर्ण संबंध –

पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मालदीव सरकार आपल्याच देशात अडचणीत आले आहे. या मुद्द्यावर मालदीवच्या माजी उपसभापती इवा अब्दुल्ला यांनी पंतप्रधान (Maldive) मोदींच्या वक्तव्याला ‘लज्जास्पद आणि वर्णद्वेषी’ म्हटलं आहे. या मुद्द्यावर मुइज्जू सरकारने भारतीयांची माफी मागावी, असे इवा म्हणाली. माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी सोशल मीडियावर मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून भारताविरोधात ‘द्वेषपूर्ण भाषा’ वापरल्याचा निषेध केला.

भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र राहिला आहे आणि आम्ही अशा अपमानास्पद टिप्पण्यांमुळे आमच्या दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये, असे त्यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनीही मोदींवरील टिप्पणी निंदनीय आणि घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सार्वजनिक व्यक्तींनी शिष्टाचार राखला पाहिजे. ते आता ‘सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्ह’ राहिलेले नाहीत आणि लोकांच्या आणि देशाच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, हे त्यांना मान्य करावे लागेल.

माजी क्रीडा मंत्री अहमद महलूफ म्हणाले की, भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ते म्हणाले की, आमचे भारत आणि भारतीयांवर प्रेम आहे, मालदीवमध्ये त्यांचे नेहमीच स्वागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.