Maharashtra : संपूर्ण स्वच्छता मोहीम ही फक्त मोहीम नसून लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज : स्वच्छता ही प्रत्येकाच्या (Maharashtra) आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत.स्वच्छता ही प्रत्येकाच्या (Maharashtra) आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. ही फक्त एक मोहीम नसून हे जनतेचं अभियान आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच स्वच्छतेचे हे अभियान लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहिमेला नेपियन सी रोड, प्रियदर्शनी पार्क येथून सुरुवात होऊन नरिमन पॉईंट, एनसीपीए, कर्नक बंदर या ठिकाणी ही मोहिम राबवून शिवडी-न्हावा शेवा (एमटीएचएल), कोस्टल रोड या प्रकल्पांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सुधाकर शिंदे, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता श्री. स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.