Maval : शेतात सापडलेल्या कासवाला जीवनदान

एमपीसी न्यूज – तळेगाव जवळील माळवाडी येथे एका (Maval) शेतात मंगळवारी (दि. 4) कासव सापडले. त्याबाबत शेतकऱ्याने वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला माहिती दिली. संस्थेच्या सदस्यांनी कासवाची पाहणी करून कोणतीही इजा झाली नसल्याने त्याला नदी मध्ये सोडून दिले.

Donald Trump : पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रसिद्ध गाडा मालक हभप अशोक उर्फ विठ्ठल पाचपिंड यांना मंगळवारी शेतामध्ये काम करत असताना एक कासव सापडले. त्याबाबत त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य भास्कर माळी यांना फोनवरून माहिती दिली. त्यानुसार वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य पाचपिंड यांच्या शेतात पोहोचले.
शेतात आढळलेले कासव आकाराने लहान होते. त्याला कोणतीही इजा झालेली नव्हती. त्यामुळे त्याला नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कासवाला सुरक्षितपणे नदीमध्ये सोडून देण्यात आले.
कोणताही वन्यप्राणी, सर्प दिसला तर वन्यजीव रक्षक मावळ या संस्थेच्या प्राणी मित्राशी संपर्क (Maval) साधावा. असे आवाहन संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, भास्कर माळी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.