Today’s Horoscope 05 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग… सोमवार, दिनांक… 05 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ…  10 पर्यंत वर्ज्य दिवस.
  • आज विशेष… संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 20.38)
  • राहूकाळ… सकाळी 07.30 ते 09.00
  • दिशा शूल….पूर्वेस असेल.
  • नक्षत्र… 14.56 पर्यंत भरणी नंतर कृत्तिका
  • आजची चंद्र राशी… मेष 21.42 पर्यंत नंतर वृषभ.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी)
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. मनाच्या लहरीपणास थोडा लगाम गरजेचा आहे. अति आक्रमकतेने नुकसान होईल. थोडे सामंजस्याचे धोरण ठेवा.


वृषभ – (शुभ रंग – क्रीम)
कंजुषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या होला हो करा आणि वाद टाळा

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)
वाणीत गोडवा ठेवून आज तुम्ही  विरोधकांनाही आपलेसे करू शकाल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)
नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र मात्र आश्वासने पाळणार नाहीत. कुणावरही विसंबून राहू नका आज स्वावलंबनच कामी येईल.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रामाणिक कष्टांना दैवाची साथ लाभेल.

कन्या – (शुभ रंग – मोरपंखी)
आज घरा बाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. नोकरीच्या ठिकाणी नियम तंतोतंत पाळा. वाहन चालवताना काळजी घ्या.

तूळ – (शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रात मान वाढेल. काही अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना मनाजोगत्या स्थळांचे प्रस्ताव येतील. आज वैवाहिक जीवनात तू तिथे मी.


वृश्चिक
– (शुभ रंग – गुलाबी)
काही मानापमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल आज तुमच्या संयमाची कसोटी राहील रुग्णांनी पथ्यपाणी काटेकोरपणे पाळावे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश.

धनु – (शुभ रंग – केशरी)
पार्लर्स, फोटोग्राफी, मॉडेलिंग सारखे व्यवसाय तेजीत चालतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होईल. गूढ शास्त्रांच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल. रुग्ण ठणठणीत बरे होतील.

मकर – (शुभ रंग – गुलाबी)
अति दगदग टाळा. महत्त्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावून आज थोडे तब्बेतीवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गृहिणी सासुबाईकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकून धन्य होतील.


कुंभ
– (शुभ रंग – लाल)
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग जास्त होईल. शेजारी आपुलकीने वागतील.  स्थावराच्या खरेदी-विक्रीमध्ये काही अडथळे निर्माण होतील.

मीन – (शुभ रंग – निळा)
व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. काही दुरावलेली नाती ही जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. गृहणी आज पाहुण्यांची ऊठबस आगत्याने करतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.