Today’s Horoscope 08 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग… गुरुवार, दिनांक… 08 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ… 17 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष… साधारण दिवस 
  • राहूकाळ…दुपारी 01.30 ते 03.00.
  • दिशा शूल….दक्षिणेस असेल.
  • नक्षत्र… मृग 22.50 पर्यंत नंतर आद्रा
  • आजची चंद्र राशी… वृषभ 09.47 पर्यंत नंतर मिथुन.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – लाल)
आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे आहे. आज जास्त बडबड करू नका. तुमचीच काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे. सतर्क राहा.


वृषभ – (शुभ रंग – डाळिंबी)
आज पैशाची कमतरता भासणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल. भावंडांमध्ये मात्र मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

मिथुन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. आज योग्य माणसे संपर्कात येतील. काही महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल.

कर्क – (शुभ रंग – आकाशी)
आज तुम्ही आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. काहीजण भविष्यकाळाच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्राधान्य देतील.

सिंह –  (शुभ रंग – मरून)
तुमचा कामातील उत्साह पाहून आज सहकाऱ्यांना प्रेरणा मिळेल. हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होणार आहे.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)
नोकरदार मंडळींना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. अधिकारी वर्गास आज कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे दडपण जाणवेल.

तूळ – (शुभ रंग – पिस्ता)
सरकार दरबारी कामे रखडतील. नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे पालन करणे हिताचे राहील. श्रद्धाळू गृहिणींचा देव-धर्म चालूच राहील. आज देवही नवसाला नक्की पावेल.


वृश्चिक
– (शुभ रंग – मोरपंखी)
शारीरिक कष्टांची कामे करणार्‍यांनी आपल्या सुरक्षेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळलेले बरे. आज आपल्या प्रतिष्ठेस जपा.

धनु – (शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही व्यवसायातल्या वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यास समर्थ असाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची भक्कम साथ राहील. वादविवादात आज आपल्याच मतावर अडून बसाल.

मकर – (शुभ रंग – निळा)
दैनंदिन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. आज विरोधकांना चहा पाजूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल.


कुंभ
– (शुभ रंग – सोनेरी)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडणार आहेत. काही भाग्यवान महिला आज हिरे माणकांची खरेदी करतील. काहीजणांना गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल.

मीन – (शुभ रंग – पांढरा)
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून तुम्ही आज कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुलांचे लाड पुरवाल. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागेल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.