Today’s Horoscope 09 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – गुरुवार, दि. 09 सप्टेंबर 2021

  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
  • आज विशेष – हरतालिका तृतीया.
  • राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – हस्त 14.31 ऐश्वर्या पर्यंत नंतर चित्रा.
  • चंद्र राशी – कन्या.
————————————

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. तब्येतही जरा नरमच असल्याने आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. काही मोफत सल्लागार मंडळी उगीच डोक्याला ताप देतील.

वृषभ – ( शुभ रंग- मरून )

नवीन ओळखी व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर ठरतील. विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वतःचा स्वार्थ साधून घ्याल. आज तुम्ही जरा मौजमजेस प्राधान्य द्याल.

मिथुन – (शुभ रंग- हिरवा )

कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

कर्क – (शुभ रंग – पांढरा )

कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार आज नकोत.

सिंह- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कठोरपणे बोलून कोणाचे मन दुखवू नका.

कन्या – ( शुभ रंग – पिस्ता )

आज तुम्ही एखादी क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू  देऊ नका. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे.

तुळ – ( शुभ रंग – मोतिया)

उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. खर्च आवाक्याबाहेर जाइल. काहीजणांना अचानक दूरच्या प्रवासास निघावे लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- ( शुभ रंग- सोनेरी )

उद्योग व्यवसायात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. मित्र-मैत्रिणी तुमचा शब्द झेलतील. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल.

धनु – (शुभ रंग -आकाशी )

नोकरीधंद्यात उत्साही दिवस राहील.  योग्य वेळी अधिकार वापरावे लागणार आहेत. प्रतिष्ठितांच्या ओळखी कामी येतील.  आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामातही अडथळे येणार आहेत आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी असतील तर मागितल्यावर वसूल होतील.

कुंभ – ( शुभ रंग – लाल )

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

मीन – ( शुभ रंग – क्रीम )

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील. संध्याकाळी सत्संगात रमाल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.