Today’s Horoscope 11 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, शुक्रवार, दिनांक…11 सप्टेंबर 2020

  •  शुभाशुभ…दुपारी एकनंतर चांगला दिवस.
  • आज विशेष .. सप्तमी श्राध्द.
  • राहूकाळ…दुपारी 12.00 ते 01.30
  • दिशा शूल…उत्तरेस असेल.
  • नक्षत्र… कृत्तिका 11.15 पर्यंत नंतर रोहिणी
  • आजची चंद्र राशी… वृषभ.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभरंग – पिस्ता )
बेरोजगारांना रोजगार मिळेल. आज भावंडांमध्ये सुसंवाद राहील. गृहिणी घराच्या स्वच्छतेचे मनावर घेतील. शेजाऱ्यांशी सलोखा राहील. आज अत्यंत व्यस्त दिवस.


वृषभ – ( शुभ रंग – सोनेरी )
काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल.  कार्यक्षेत्रातील पूर्वीच्या श्रमाचे चीज होईल. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

 

मिथुन -( शुभ रंग – पांढरा )
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. आवक पुरेशी असली तरी आज पैसा जपून वापरणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.

 

कर्क – ( शुभरंग -चंदेरी )
कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील. आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. नोकरदारांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. खर्च टाळता येणार नाही.

 

सिंह – ( शुभरंग -केशरी )
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस सत्कारणी लावा. विवाहविषयक काही बोलणी करायची असतील तर आज उरकूनच घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक दिवस आहे.

 

कन्या – ( शुभ रंग -हिरवा )
नोकरीच्या ठिकाणी स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. वाहतुकीचे नियम तोडू नका अन्यथा दंड भरावा लागेल.

 

तूळ – ( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )
ज्येष्ठ मंडळींचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. श्रद्धाळूंना एखाद्या साधनेची प्रचिती येईल. महत्वपूर्ण निर्णय आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्या. सरकार दरबारी कामे रखडणार आहेत.

 

वृश्चिक -( शुभ रंग- निळा )
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरदारांनी सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. वाहन चालवताना ओव्हरटेक करणे टाळा. आज कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.

 

धनु – ( शुभ रंग – आकाशी )
कौटुंबिक स्तरावर काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवणार आहेत. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार येईल. वैवाहिक जीवनात आज दोघात तिसरा नको.

 

मकर – ( शुभ रंग – जांभळा )
व्यवसायात स्पर्धा अटळच आहे. नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. घरी पत्नीचाही लहरी सांभाळाव्या लागतील. काही येणी असतील तर  वसूल होतील, पण मागायला लाजू नका.

 

कुंभ – ( शुभ रंग -गुलाबी )
लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. आवडते छंद जपण्यासाठी वेळ काढता येईल. नवोदित कलाकारांना कामे मिळतील.

 

मीन – ( शुभ रंग -डाळिंबी )
कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील आणि ते भविष्यकाळाच्या दृष्टीने फायद्याचे राहतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील.

 

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.