Today’s Horoscope 11 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 11 September 2023 
वार – सोमवार.
11.09.2023
शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष-शिव मुष्टी – जवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- पुष्य 20.01 पर्यंत नंतर आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
——————————–
मेष – ( शुभ रंग- मोतिया )
मंदावलेल्या व्यापार उद्योगास गती येईल कार्यक्षेत्रात तुमची मते इतरांना आता पटू लागतील. स्थावरचे शेतीवाडी चे व्यवहार लाभ देतील. आईने दिलेले सल्ले महत्वपूर्ण असतील.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मिथुन (शुभ रंग- राखाडी )
गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून द्याल. धंद्यात काही येणे अनपेक्षित पणे वसूल होण्याची शक्यता आहे. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवायला हवेत.

कर्क (शुभ रंग- जांभळा)Today’s Horoscope 11 September 2023 
तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचे म्हणणेही ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान असावे.

सिंह (शुभ रंग- केशरी)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो. विदेशाशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील.

कन्या (शुभ रंग – हिरवा)

आजच्या दिवसातील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध असावे. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)
आज नोकरीत वरिष्ठांची शाब्बासकी मिळू शकेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम करा. कर्तव्यास प्राधान्य द्या.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळावा. स्वतःवर संयम ठेवा.

धनु (शुभ रंग- पिस्ता)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

मकर ( शुभ रंग- भगवा )
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आज एखादा विवाह जुळवण्यात तुम्ही मध्यस्थी कराल.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील काही मतभेद सामंजस्याने मिटू शकतात.

मीन (शुभ रंग – गुलाबी )
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ असेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हिरवा वाटेल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.