Today’s Horoscope 12 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 12 September 2023
वार – मंगळवार.
12.09.2023
शुभाशुभ विचार- त्रयोदशी वर्ज्य.
आज विशेष- भौमप्रदोष.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा 23.01 पर्यंत नंतर मघा
चंद्र राशी- कर्क 23.01 पर्यंत नंतर सिंह.
————————————
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )
अत्यंत सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात कराल. तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल. आज घरात सजनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आलेली कुठलीही संधी सोडू नका.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
धनस्थानातील चंद्र भ्रमण तुमची आर्थिक आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस आहे

कर्क (शुभ रंग- पांढरा.)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळावे तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )Today’s Horoscope 12 September 2023
आज काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभाने आकर्षित करतील. आज तुम्ही थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
आज हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडेच तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने ही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी मनापासून खर्च कराल.

तूळ ( शुभ रंग- निळा)
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. अति व्यस्त दिवस.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के असेल नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती आध्यात्मिक होणार आहेत.

धनु- (शुभ रंग- चंदेरी)
जे चाललंय ते बर चाललय म्हणा. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरून चालणार नाही. धाडसाची कामे आज टाळलेलीच बरी आज सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो.

मकर ( शुभ रंग- जांभळा )
वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील आज उगीच इतरांच्या भानगडीत डोकावू नका.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बाढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्कीच मिळेल

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी अशी एखादी कामगिरी कराल. उच्चशिक्षित तरुणांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Talegaon Dabhade : कलापिनी सांस्कृतिक केंद्रात शाडू मातीचे गणपती घडविण्याची कार्यशाळा संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.