Today’s Horoscope 13 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार

13.05.2023

शुभाशुभ विचार – क्षयतिथी.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- धनिष्ठा 11.35 पर्यंत नंतर शततारका.

चंद्र राशी – कुंभ.

——————–——————–

मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणारी कामे तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी )

नोकरीच्या ठिकाणी आज अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून आज आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी इतरांच्या भानगडीत न डोकावता फक्त आपले काम बिनचूक करण्यास प्राधान्य द्यावे.

कर्क (शुभ रंग- मोतिया)

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने नवे उपक्रम उद्यावर ढकला. पती-पत्नी मधील वादावर आज मौन हाच रामबाण उपाय राहील.

सिंह ( शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात वावरताना आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावात राहील. तुमच्यातील नेतृत्वगुणास चांगला वाव मिळेल. पत्नीच आज योग्य सल्ले देणार आहे.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणीसाठी अतिवस्त दिवस असून आरोग्याच्या तक्रारींची वेळीच दखल घ्या.

तूळ ( शुभ रंग- मरून)

नोकरदारांना वरिष्ठांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. कलाकारांच्या उमेदवारी यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्ण व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता)

आज आनंदी व उत्साही असा दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. गृहिणींना गृह उद्योगातून सांगली मिळकत मिळेल. कलेच्या क्षेत्रातील नवोदिकांना स्ट्रगल वाढवावी लागेल.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवला तर अनेक किचकट प्रश्न सहजच मार्गी लावाल.

कुंभ (शुभ रंग – हिरवा)

महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्याच मतावर ठाम असाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली करा ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेला पैसा जपून वापरावा. मनःशांतीसाठी नामस्मरणा शिवाय दुसरा पर्याय नाही.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.