Talegaon : किशोर आवारे अनंतात विलीन

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची (Talegaon) शुक्रवारी (दि. 12) दुपारी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री पावणेबारा वाजता तळेगाव येथील बनेश्र्वर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर आवारे यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ, आई असा मोठा परिवार आहे. जनसेवा विकास समितीचे ते संस्थापक अध्यक्ष होते. जनसेवा विकास सेवा आघाडीच्या माध्यमातून ते तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रीय होते. सोमाटणे टोलनाका बंद करण्यासाठी त्यांनी नुकतेच मोठे आंदोलन केले होते. यासह वेळोवेळी त्यांनी अनेक आंदोलने करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले.

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, किशोर आवारे यांचे जाणे ही घटना मनाला चटका लाऊन जाणारी आहे. त्यांनी समाजाला मदत करण्याचे अखंडपणे काम केले. कोरोना साथीच्या काळात त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांनी सातत्याने समाजातील उणीवा दूर करण्याचे काम  केले. त्यांच्यावर ज्या मानसिकतेतून हा हल्ला झाला, ती मानसिकता कुणाच्याही मनात येऊ नये.”

माजी मंत्री बाळा भेगडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, “किशोर आवारे यांनी तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात काम करताना न्यायासाठी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांचा मृत्यू ही मोठी दुर्दैवी घटना आहे. ते सातत्याने समाज हिताच्या कामाच्या निमित्ताने ठिकठिकाणी उपस्थित असत. त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे.”

गणेश खांडगे यांनी किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.