Todays Horoscope 17 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 17.05.2022

  • शुभाशुभ विचार- क्षयदिन.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 3.00 ते  4.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अनुराधा 10.46 पर्यंत नंतर ज्येष्ठा.
  • चंद्र राशी – वृश्चिक.

_________________________

आजचे राशिभविष्य –

मेष – ( शुभ रंग- जांभळा)

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. कार्यक्षेत्रात फार सावधगिरीने पावले टाकायला हवीत. वैवाहिक जीवनात थोडेफार मतभेद संभवतात पण फार न ताणता तुम्ही ते सामंजस्याने घ्याल.

वृषभ – (शुभ रंग- मोरपिशी)

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकलले तर बरे होईल. आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस लुडबुड करू देऊ नका.

मिथुन ( शुभ रंग – मोतीया )

व्यावसायिक अडचणींवर जिद्दीने मात कराल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मोलाचा असेल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर विसंबून राहू नका.

कर्क – ( शुभ रंग – मरून)

आज आर्थिक आवक उत्तम राहील. मुलांच्या मागण्या हौशीने पुरवाल. कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो.

सिंह – ( शुभ रंग- डाळिंबी)

काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश सोपे होईल. गृहिणी आपल्या आवडत्या छंदातूनही चांगली कमाई करतील.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. भावंडांचे मात्र आज एकमेकांना चांगले सहकार्य राहील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शकतो.

तुळ – ( शुभ रंग- निळा)

तरुणांनी आपल्या मर्यादेत राहणे हिताचे उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यायला हवी. ज्येष्ठ मंडळींना कदाचित डेंटिस्ट ची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल

वृश्चिक -(  शुभ रंग- केशरी)

आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कर राहील. घरातील थोरांशी काही क्षुल्लक कारणांवरून वाद होतील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येईल.

धनु – ( शुभ रंग- आकाशी )

व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी नव्या योजना राबवाव्या लागतील. जुने विचार गुंडाळून ठेवावे लागतील.  आज बिनधास्त खर्च करा. बचतीचा विचार सोडून द्या.

मकर – ( शुभ रंग – पिस्ता)

कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल  आज काही रखडलेली किचकट कामेही मार्गी लागतील. विवाह विषयक चर्चा सकारात्मकतेने पार पडतील.

कुंभ – ( शुभ रंग -पांढरा )

आज तुम्ही रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल आपल्या कामातील तत्परतेने वरिष्ठांची मने जिंकाल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन ची चाहूल लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल.

मीन – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. यथाशक्ती दानधर्म कराल. वडीलधाऱ्यांच्या वयाचा मान राखाल. महत्त्वाचे निर्णय घेताना आज तुमची द्विधा मनस्थिती होणार आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.