Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ उपाध्यक्षपदी पंढरीनाथ ढोरे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ उपाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील पंढरीनाथ राजाराम ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते ढोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर, माजी उपसरपंच विशाल वहिले, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मंगेश खैरे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रोहिदास गराडे, अनिकेत भगत, संतोष निघोजकर,सचिन वाडेकर उपस्थित होते.

 

पंढरीनाथ ढोरे यांनी यापूर्वी वडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच,खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अशा विविध पदांवर काम केले आहे. तसेच स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून त्यांच्या पुढाकाराने प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम राबविण्यात येतो.

 

ढोरे यांची राजकिय व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्यावर वरीष्ठ उपाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे आगामी काळात पदाच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवून मावळ तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.