Today’s Horoscope 18 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  शुक्रवार . ….. ​दि​.  18 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –१४ नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – विनायक चतुर्थी.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – श्रवण. १९.०४ पर्यंत नंतर धनिष्ठा.
  • चंद्र राशी –  मकर.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी )

व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. कामाच्या प्रचंड व्यापामुळे महत्वाच्या घरगुती प्रश्नांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम करा.

वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)

वडीलधार्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास लगाम घालणे हिताचे राहील.

मिथुन –  (शुभ रंग- चंदेरी)

आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणा, आणि देण्याघेण्याचे व्यवहार काळजीपूर्वक करा.

कर्क( शुभ रंग – गुलाबी)

बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. आज संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यात पती-पत्नी जोडीने मिरवाल.

सिंह – ( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊन अडकू नका.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

काही नव्या ओळखी होतील  तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. आज केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.

तूळ  ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळ)

बरेच दिवसापासून तुम्हाला अपेक्षित असलेली मेल्स येतील. आज आई बरोबर मतभेद संभवतात. दुरावलेले शेजारी मात्र जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येणार आहेत.

धनु (शुभ रंग – मोरपिशी)

आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. धंद्यातील काही येणी आकस्मिक रीत्या वसूल होतील.

मकर – ( शुभ रंग – मरून)

आज हाती पैसा खेळता राहील, आवडत्या क्षेत्रात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. अनेक अवघड कामे सोपी होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

कुंभ ( शुभ रंग- नारिंगी)

आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.

मीन  ( शुभ रंग- डाळिंबी)

हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. उद्योगधंद्यात प्रगतीरथ वेगवान राहील.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.