Today’s Horoscope 18 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 November 2022
वार – शुक्रवार.
18.11.2022
शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा 23.08 पर्यंत नंतर उत्तरा.
चंद्र राशी – सिंह.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज तुमचा मौसमजा करण्याचा मूड असेल. सहकुटुंब चैन कराल. प्रेमी युगुलांना घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चेतच जास्त रमण कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याचा तुमचा मूड असेल गृहिणींना गृह उद्योगातून चांगली कमाई होईल.

मिथुन ( शुभ रंग- निळा )
आज घराबाहेर वावरताना डोके शांत व वणीत गोडवा असू द्या. काही अति हुशार मंडळी संपर्कात येणार आहेत मोफत सल्लागार मंडळींच्या होला हो करा व वादविवाद टाळा.

 

कर्क (शुभ रंग- पिस्ता.)
आज व्यापार उद्योगात तुमची मिळकत मनाजोगती असेल. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करू शकाल. आप्तस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. गोड बोलून इतरांची मने जिंकाल.

सिंह (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल, तुमच्याकडून काही आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुणालाही मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. काही जणांना आज तातडीच्या प्रवासास निघावे लागेल. केवळ भिडस्तपणा मूळे न परवडणारा खर्च अजिबात करू नका.

तूळ ( शुभ रंग- केशरी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. आज जसे चिंतल तसेच होईल त्यामुळे आज फक्त शुभ चिंता.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा)
आज तुम्ही रिकामटेकडी चर्चा टाळून फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गास वाढत्या जबाबदाऱ्यांचे धडपड येईल. मित्र आज चुकीचे सल्ले देतील.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील. आज तुमचा अध्यात्माकडे कल राहील. घरात देवकार्य करण्याचे बेत आखाल. घरातील मोठ्यांच्या शब्दांचा मान राखावा लागेल.

मकर ( शुभ रंग- चंदेरी)
आज आपल्या कुवती बाहेर कोणतीच रिस्क घेऊ नका. हातचे सोडून पळत्या मागे धावण्याचा मोह टाळा. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ संभवतो पत्नीच्या होला हो करा विषय संपवा.

कुंभ (शुभ रंग – मोरपिशी )
व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील आज वैवाहिक जीवनात ही गोडी गुलाबी असेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा आज तुमचा प्रयत्न असेल. छान दिवस.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
नोकरदारांना कामाचे तास वाढवावे लागतील कोणतीही गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल.आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

शुभम भवतु.

जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.