Today’s Horoscope 21 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – बुधवार दि. 21 जुलै 2021

  • शुभाशुभ विचार – 18 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष — प्रदोष.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – ज्येष्ठा 18.30 पर्यंत नंतर मूळ.
  • चंद्र राशी – वृश्चिक 18.30 पर्यंत नंतर धनु.

_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग राखाडी)

हौस मौज जरूर करा. करा परंतु आपल्या मर्यादा सांभाळाव्या. कुसंगती पासून लांब रहा वाहन चालवताना जरा जपून. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

वृषभ – ( शुभ रंग – डाळिंबी)

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग  सहज सोडवू शकाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता )

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळले तर आजार बळावण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत यश मिळेल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम )

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. महत्त्वाच्या कामाला आज विलंब होणार आहे. रुग्ण आज ठणठणीत बरे होतील. कोर्टाची पायरी न चढलेली बरी.

सिंह – ( शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमप्रकरणे डोक्याला ताप देतील.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. प्रॉपर्टी च्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. संततीकडून आज काही सुवार्ता येतील.

तुळ – ( शुभ रंग – लाल)

आज अनपेक्षित रित्या काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. विविध जाहिराती गृहिणींना भुरळ घालतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अति आत्मविश्वास आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरू शकेल.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज रिकामटेकड्या चर्चेत तुमचा बराच वेळ फुकट जाईल. काही महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. नोकरीत बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज आनंदी दिवस.

मकर – ( शुभ रंग- पांढरा)

उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घेण्यास विलंब होऊ देऊ नका. मित्रमंडळीत आज तुमच्या शब्दाचा मान राहील. छान दिवस.

कुंभ – ( शुभ रंग- निळा)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल वेगाने सुरू राहील. मित्रांपासून दोन हात लांबच राहा. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आज नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. वरिष्ठांशी नमते घ्यावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.