Todays Horoscope 24 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार सोमवार, दि. 24.01.2022

  • शुभाशुभ विचार -09 पर्यंत चांगला.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – हस्त 11.15 पर्यंत नंतर चित्रा.
  • चंद्र राशी – कन्या 23.08 पर्यंत नंतर तूळ.

______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग –  डाळिंबी)

दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील. झटपट लाभाचा मोह मात्र टाळायला हवा. जिभेचे चोचले पुरवू नका. पोट बिघडेल.

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुम्हाला आर्थिक उन्नतीचे विविध मार्ग खुले होतील. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल. खर्च कितीही वाढला तरी पैशाची कमतरता जाणवणार नाही.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. आप्तस्वकीयात वावरताना वाणीत मृदुता असू द्या.

कर्क- (शुभ रंग – राखाडी)

आज कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडतील. अति स्पष्टवक्तेपणामुळे नाती दुरावतील. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

सिंह – (शुभ रंग- भगवा)

आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. पूर्वीच्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. पाहुण्यांची वर्दळ राहील.

कन्या- ( शुभ रंग – हिरवा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. उद्योग व्यवसायात आक्रमकतेने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. हरवलेले गवसेल.

तूळ – ( शुभ रंग- केशरी)

ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. देण्यघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाणार आहे.

वृश्चिक- ( शुभ रंग- नारंगी)

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.

धनु – ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रमोशनची चाहूल लागेल. मामा मावशीकडून काही सुवार्ता येतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा.

मकर- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. कायद्याची चौकट स्वप्नातही मोडू नका.

मीन- ( शुभ रंग- मोरपंखी)

घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.