Pune Accident News : पुण्याजवळ विचित्र अपघात; 4 जणांचा जागेवरच मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-अहमदनगर महामार्गावर शिक्रापूरजवळ झालेल्या विचित्र अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रक, कार आणि दोन दुचाकीचा हा अपघात झाला आहे.

पुणे-अहमदनगर महामार्गावरील 24 वा मैल येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील ट्रकने एक कार आणि दोन दुचाकीला धडक दिली. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता तर कार आणि दुचाकी नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला धडकला. दरम्यान या भीषण अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे.

अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.