Today’s Horoscope 26th April 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ
आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 26.04.2022
- शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
- आज विशेष – वरूथिनी एकादशी.
- राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
- दिशा शूल -उत्तरेस असेल.
- आजचे नक्षत्र – शततारका 16.56 पर्यंत नंतर पूर्वाभाद्रपदा
- चंद्र राशी – कुंभ.
————————————————
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – पिस्ता)
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम यशस्वी होतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. काही अपुरी स्वप्ने पूर्ण होतील.
वृषभ – ( शुभ रंग – क्रीम)
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे आहे. पिताश्री आज योग्य सल्ला देतील मित्रांना मात्र लांब ठेवा.
मिथुन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.
कर्क – (शुभ रंग – सोनेरी)
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पोट बिघडणार आहे, खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा तरुणांनी चुकीची संगत टाळणे हिताचे राहील.
सिंह – (शुभ रंग – पांढरा)
आज नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.
कन्या – (शुभ रंग – गुलाबी)
आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लगार मंडळीही भलतेच बोअर करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात असू द्या.
तूळ – ( शुभ रंग- मोरपिशी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल.
वृश्चिक – ( शुभ रंग – केशरी )
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने आनंदित व्हाल.
धनु – ( शुभ रंग-आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा ही अतिरेक नको, कारण त्याने निराशा पदरी पडू शकते.
मकर – (शुभ रंग- जांभळा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना आज तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल.
कुंभ – ( शुभ रंग – सोनेरी)
आज हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडेल. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो सावध राहा.
मीन – ( शुभ रंग – निळा )
आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मोठ्या लाभाच्या मोहाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)