Todays Horoscope 27 November 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार –  शनिवार, दि. 27.11.2021

  • शुभाशुभ विचार – 08 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – कालभैरव जयंती, कालाष्टमी.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मघा 21.43 पर्यंत नंतर पूर्वा.
  • चंद्र राशी – सिंह.

—————————————

आजचे राशीभविष्य –

मेष – (शुभ रंग – मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. विरोधकांचा ही उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील.

वृषभ -( शुभ रंग- सोनेरी )

आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील. आईचे सल्ले योग्य असतील.कलाकारांना मात्र निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

मिथुन- ( शुभरंग – केशरी )

ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. वाद-विवाद संभवतात. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. परंतु भावनेच्या भरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका.

सिंह – ( शुभ रंग – मरून )

आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.

कन्या -( शुभ रंग- डाळिंबी )

आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )

जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी )

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशन ची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. अति व्यस्ततेमुळे घरगुती कामे दुर्लक्षित होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा )

हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी )

विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.

कुंभ- (शुभ रंग- मोरपिशी)

घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. जिभेचे चोचले पुरवू नका. पोट बिघडणार आहे. विवाह जुळवण्या विषयी चर्चा आज नकोत.

!! शुभम भवतु!!
श्री. जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी आणि वस्तू सल्लागार )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.