Today’s Horoscope 30 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…बुधवार, दिनांक…30 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… चांगला दिवस.
  • आज विशेष… सामान्य दिवस.
  • राहूकाळ… दुपारी 12.00 ते 01.30
  • दिशा शूल…उत्तरेस असेल.
  • नक्षत्र… पूर्वाभाद्रपदा.
  • आजची चंद्र राशी… कुंभ 20.37 पर्यंत नंतर मीन.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला पात्रतेपेक्षा काहीतरी जास्तच पदरात पडणार आहे. पैशाची काळजी दूर होईल आजचा दिवस लाभाचा आहे. आज जिवलग मित्रांसाठी खर्च कराल.


वृषभ – (शुभ रंग – तांबडा)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा वचक जाणवेल. आज क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योग्य वेळी अधिकार वापरावेच लागणार आहेत. आज मित्रांना थोडे दूरच ठेवा.

मिथुन – (शुभ रंग – पिस्ता)
आज तुम्ही काही व्यावसायिक अडचणीवर जिद्दीने मात कराल. तुमच्या प्रामाणिक कष्टांना दैवाची साथ मिळेल. आज कायद्यात राहाल तरच फायद्यात रहाल

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
व्यवसायात मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका. झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. तरुणांनी वाहन चालवताना स्टंट करू नयेत. स्वतः वर संयम ठेवावा.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)
आज तुम्ही सकारात्मकतेने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहात. एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. कार्यक्षेत्रात गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल.

कन्या – (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्हाला काही मोफत सल्लागार मंडळी भेटतील. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात असू द्या. कुणीही केलेल्या खोट्या स्तुतीने भारावून जाऊ नका.

तूळ – (शुभ रंग – आकाशी)
तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. कलेच्या क्षेत्रात असणाऱ्यांना प्रसिद्धी मिळेल. मुले आज पालकांच्या आज्ञेत असतील. गृहिणी सौंदर्य प्रसाधने खरेदी करतील.


वृश्चिक
– (शुभ रंग – राखाडी)
आज कामावर दांडी मारून घरी मस्त झोप काढण्याचा तुमचा मूड असेल. आज थोडे मुलांच्याही अभ्यासात डोकावणे गरजेचे आहे. कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या शोधात असतील.

धनु – (शुभ रंग – डाळिंबी)
कार्यालयीन कामासाठी भटकंती करावी लागेल. काही कारणाने झालेले भावंडांतील गैरसमज दूर होतील. गृहिणींना शेजारधर्म जपावा लागणार आहे.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
हाती पैसा खेळता असल्याने मनस्थिती छान असेल. एखाद्या सामाजिक कार्यात हौशीने पुढाकार घ्याल.  गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.

कुंभ – (शुभ रंग – निळा)
आज तुम्हाला थोडी संयमाची गरज असून अविचारीपणाने  घेतलेले काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल.

मीन – (शुभ रंग – जांभळा)
आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडण्यापूर्वी दहा वेळा विचार आवश्यक आहे. गृहिणी तर आज झाकली मूठ झाकलेली ठेवणेच गरजेचे आहे.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.