Pune News : नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या  या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये : प्रशासनाचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या उत्सवाच्या काळात  नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनातर्फे म्हटले आहे.

गणेशोत्सवामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता नवरात्रोत्सवात नागरिक घराबाहेर पडू नयेत, यासाठी बंधने घालण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. 

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. याबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. गणेशोत्सव संपल्यावर कोरोना  बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 17 सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत दररोजच्या चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण 30 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर आले आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.उत्सवाच्या काळात नागरिक हे घराबाहेर पडल्याने या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे. मात्र, नवरात्रोत्सवात नागरिकांनी काळजी न घेतल्यास पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती असल्याचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.