Today’s Horoscope 31 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 31 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – गुरुवार.

31.08.2023.

शुभाशुभ विचार – क्षायतिथी.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र- शततारका 17.45 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मरून )

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील.

वृषभ (शुभ रंग- लेमन )

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवा.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. मन:शांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

कर्क (शुभ रंग-पिस्ता )

आज आपल्या मर्यादेत राहिलेले बरे. धाडसाची कामे आज टाळली तर बरे होईल. सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

सिंह (शुभ रंग- मोरपिशी )

भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात असलेले बरे. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)

ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्याल. छान दिवस आहे.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. आज मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे.

धनु (शुभ रंग- सोनेरी)

प्रॉपर्टी विषयी मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. प्रवासात आज काही नवीन नाती जुळून येतील आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत. डोके शांत ठेवायला हवे.

मकर ( शुभ रंग- चंदेरी )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्ये जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)

आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. काही क्षुल्लक गोष्टींवरून तुम्हाला राग येऊ शकतो. महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे तुम्ही पुढे दमटवाल.

मीन (शुभ रंग – आकाशी )

बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास करावे लागतील. दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.