Today’s Horoscope 31 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  रविवार.  …. ​दि​.  31 जानेवारी 2021

 

  • शुभाशुभ विचार — ०९ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष –संकष्ट चतुर्थी  ( चंद्रोदय २१.००)
  • राहू काळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी.
  • चंद्र राशी –  सिंह.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – राखाडी)
उच्चशिक्षित असाल तर मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव चालून येतील. मोठ्या लोकांच्या ओळखीतून आपला वैयक्तिक स्वार्थ साधून घेता येईल. काहींचा गुढ शास्त्राकडे कल निर्माण होईल

वृषभ – ( शुभ रंग – हिरवा)
कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर न घेतलेल्या बऱ्या. रोहिणी आज दिवसभर व्यस्त असतील.

मिथुन – (शुभ रंग- पिस्ता)
आज भाडेकरूंचे घर मालकाशी वाद संभवतात. कदाचित वाहनांच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. शेजारी सलोखा वाढेल. याचे ऐकून त्याला सांगू नका.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
आज उद्योग-धंद्यात आवक मनाजोगती राहील. मनसोक्त खर्च करून स्वतःचे छंद जोपासता येतील. आपल्या अति स्पष्ट बोलण्याने मात्र कुणाच्या भावना दुखावतील. मोजकेच बोला.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रात झालेल्या अति श्रमांचा आज तब्येतीवर परिणाम जाणवेल. थोडी विश्रांतीची ही गरज भासेल. आपल्या जोडीदाराच्या भावना जपण्याचा आवर्जून प्रयत्न कराल.

_MPC_DIR_MPU_II
कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)
कामाचा व्याप अति महत्त्वाकांक्षा यामुळे थोडेसे सैरभैर व्हाल. महत्त्वाचे निर्णय घेणे अवघड होऊन बसेल. खर्चाचे प्रमाण आज आवाक्याबाहेर जाणार आहे.

तूळ – ( शुभ रंग -निळा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. मित्रांना पार्टी देण्यासाठीही खर्च कराल. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाला वजन राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग- जांभळा)
सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा आज तरी करून चालणार नाही. नोकरीत फक्त वरिष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. फार खोलात शिरल्याने तुमच्या अडचणी वाढतील.

धनु – ( शुभ रंग- भगवा )
आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल. सत्संगाकडे पावले वळतील. वडीलधाऱ्यांनी दिलेले सल्ले तंतोतंत पाळण्यातच तुमचे हित आहे.

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी मानसिक संतुलन ढळू देऊ नका. आज तब्येत थोडी नरमच राहील. आज कोणत्याही प्रकारचे धाडस टाळा.

कुंभ – (शुभ रंग- डाळिंबी)
आज कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व व कर्तुत्वही प्रभावी राहील. घरगुती अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची स्तुती करण्याची एकही संधी वाया घालवू नका.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)
धंदेवाईक मंडळींकडे  पैशाचा ओघ चांगला असेल. रखडलेले उपक्रम पूर्ववत सुरू करता येतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.