Today’s Horoscope 12 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 September 2022

वार – सोमवार

तारीख 12.09.2022

शुभाशुभ विचार- शुभ दिवस

आज विशेष – तृतीया श्राद्ध

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00

दिशा शूल – पूर्वेस असेल

आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 06.59 पर्यंत नंतर रेवती

आजची चांद्रारशी – मीन

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – तांबडा)

खर्च कितीही वाढला असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही.कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल.आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

वृषभ – (शुभ रंग – क्रीम)

पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल.दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.

मिथुन – (शुभ रंग – चंदेरी)

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील.अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधीच चालू होईल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची तुमची आज तयारी असेल.

कर्क – (शुभ रंग – सोनेरी)

आज उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस नाही.नोकरीत साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील.व्यावसायिकांना काही आकस्मिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

सिंह – (शुभ रंग – मरून)

आज फक्त आपल्याच भल्याचा विचार करा.भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आज दिवस योग्य नाही.गाडी काळजीपूर्वक चालवा.

कन्या – (शुभ रंग – आकाशी)

आज वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी असेल.महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत जोडीदाराचे मत अवश्य घ्या.हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवा.विरोधकांना कमजोर समजू नका.

तूळ – (शुभ रंग – मरून)

कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.विरोधक सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही.हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

वृश्चिक – (शुभ रंग – लाल)

आज तुमचा फक्त हौस मौज करण्याकडे कर राहील.उंची वस्त्र खरेदी कराल.शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील.कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

धनु – (शुभ रंग – भगवा)

आज स्थावर शेतीवाडी संबंधित काही व्यवहार रखडलेले असतील तर ते पूर्ण होतील.मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील.गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

मकर – (शुभ रंग – मोरपंखी)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.घराबाहेर वाद संभवतात.महत्त्वाच्या चर्चेत स्वतःचे मत मांडण्याची घाई करू नका.

कुंभ – (शुभ रंग – पिस्ता)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल.गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पडतील. आनंदी दिवस.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील.उपवारांना स्थळे सांगून येतील.आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

शुभम भवतु

जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.