Pune Rain : पुण्यात ढगफुटी सदृश पाऊस; घरा दारात पाणी; प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – रविवारी सायंकाळी पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला.या पावसाने पुणेकरांना चांगलीच झोडपून काढले. पुणेकरांना या पावसाचा मोठा फटका बसला.शहरातील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्लोगल्लीत पाणी साचले होते.अनेक घरात या पावसाचे पाणी शिरले होते. तर यामुळे वाहने देखील वाहून गेले. याशिवाय ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती.

पुण्यातील सोमेश्वर वाडी, पाषाण, वानवडी, चंदननगर, वेदभवन, कोथरूड, बी.टी. कवडे रोड, कात्रज उद्यान या परिसरात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.तर कोंढवा, साळुंखे विहार, पाषाण यासारख्या परिसरात झाडे पडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

तर दुसरीकडे शहरातील कात्रज ते नवले ब्रिज या मार्गावर मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.या महामार्गावर सध्या काम सुरू असताना बराच राडाराडा रस्त्याच्या कडेला पडलेला आहे.रविवारी रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर वाहनांची रांगच रांग लागली होती.वाहनांच्या या गर्दीतून जाताना एका ॲम्बुलन्सला मोठे कसरत करावी लागली होती.

आंबील ओढ्याला मोठा पूर

दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पुण्यात पाऊस सुरू झाला. तर शहरातील कात्रज आणि धनकवडी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने आंबील ओढयाला पूर आला होता. या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.