Crime News : भाजप नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

एमपीसी न्यूज – पुणे शहरात भाजपचा पदाधिकारी असलेल्या एका नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.शेतमजुराची अल्पवयीन मुलगी असलेल्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याच नात्यातील तरुणाने हे कुकर्म केले.. शिक्रापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका भाजप नेत्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फार्म हाऊस आहे.या फार्म हाऊसवरच आरोपी विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आई वडील काम करण्यासाठी आहेत.ही दोन्हीही कुटुंब त्या ठिकाणीच राहतात. दरम्यान पीडित मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी आरोपीने या अल्पवयीन मुलीला फार्म हाऊसच्या मागे असलेल्या खोलीत घेऊन गेला. तिला ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला.

दरम्यान पीडित मुलीच्या आई-वडिलांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणातील पिढीत तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. हे प्रकरण तातडीने मार्गी लावण्यासाठी फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.