Today’s Horoscope 9 August 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – (Today’s Horoscope 9 August 2022) मंगळवार 09.08.2022
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – भूमप्रदोष, मोहरम.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – मूळ 12.18 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
चंद्र राशी – धनु.
—————————————-
आजचे राशीभविष्य – Today’s Horoscope 9 August 2022

मेष – ( शुभ रंग -निळा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. कितीही राबलात तरी वरिष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही. आजी-आजोबांनी फार खोलात न शिरता फक्त नातवंडात रमावे.

वृषभ- ( शुभ रंग- निळा)
विरोधक सक्रिय असताना कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. वेगात गाडी चालवू नका.

मिथुन- ( शुभ रंग- गुलाबी)
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर अगदी बेहद खुश असेल.

कर्क- ( शुभ रंग- हिरवा)
आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटू शकतात. मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. कुणाकडे सल्ले मागायला जाऊच नका. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील.

सिंह – ( शुभ रंग – मोतिया)
आज तुम्हाला नेहमीच्या त्याच त्या कामाचा कंटाळा येईल. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. कलावंत व खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील.

कन्या – ( शुभ रंग – लाल )
आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. सासूबाईंनी केलेल्या कौतुकामुळे गृहणी सुखावतील. नवविवाहितांची वास्तु विषयक स्वप्न साकार होतील.

तुळ – (शुभ रंग -आकाशी)
आज तुम्हाला एखाद्या अर्जंट कामासाठी अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर डोके शांत ठेवा. वाद टाळा. शेजारी आज  फारच गोड गोड बोलतील.

वृश्चिक ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.
आज नेत्यांची भाषणे प्रभावी होतील. प्रवास मात्र कंटाळवाणे होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा)
तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखाद्या प्रश्‍नात सामंजस्याने मार्ग काढावा लागेल.
पत्नीचे सल्ले डावलू नका. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्या.

मकर -( शुभ रंग- भगवा)
असा एखादा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणे शक्य नाही. घरातील थोरांचे ही सल्ले विचारात घेणे आवश्यक राहील. ज्येष्ठ मंडळींनी अती दगदग टाळावी. आज थकवा जाणवेल.

कुंभ – ( शुभ रंग- मरून)
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. गर्भवतींना मनोवांछित संतती चा लाभ होईल.

मीन – ( शुभ रंग – नारंगी)
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना जे अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस आहे. ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल.

!! शुभम भवतु !!

– जयंत कुलकर्णी
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.