Todays Horoscope : जाणून घ्या आजचे राशिभविष्य – 19.09.2023

आजचे पंचांग – वार – मंगळवार. 19.09.2023. शुभाशुभ विचार- आनंदी दिवस. आज विशेष- श्री. गणेश चतुर्थी. राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30 . दिशा शूल – उत्तरेस असेल. आजचे नक्षत्र – स्वाती 13.48 पर्यंत नंतर विशाखा. चंद्र राशी – तूळ.
————————————
मेष – ( शुभ रंग- आकाशी )
वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी )
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल. तब्येत थोडी नरमच असेल. आज विश्रांती ही गरजेची आहे.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडे ही लक्ष असू द्या.

कर्क (शुभ रंग- मरून)
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. आज गृह सौख्याचा दिवस.

सिंह (शुभ रंग- चंदेरी)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहीणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही नवीन हितसंबंध जुळून येतील.

कन्या ( शुभ रंग- लाल )
धन स्थानातील चंद्र भ्रमण तुमची आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस आहे.

तूळ ( शुभ रंग- हिरवा )
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही काहीसे लहरीपणे वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

धनु- (शुभ रंग- क्रीम)
आज हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. काही दुरावलेली नाती आज जवळ येतील.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नव्या व्यावसायिकांना यशाची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर तुम्ही भर द्याल.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

मीन -(शुभ रंग – मोतिया)
जे चाललंय ते बरं चाललंय असं म्हणायला हवे. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह करू नका. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.