Todays Horoscope : जाणून घ्या आजचे राशिभविष्य – 21.09.2023

आजचे पंचांग – वार – गुरुवार. 21.09.2023. शुभाशुभ विचार- 16 पर्यंत चांगला दिवस. आज विशेष- गौरी आवाहन. राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00 . दिशा शूल – दक्षिणेस असेल. आजचे नक्षत्र -अनुराधा 15.35 पर्यंत नंतर ज्येष्ठा. चंद्र राशी – वृश्चिक.
————————————

मेष – ( शुभ रंग- निळा )
आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःची काळजी घ्या.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रात ही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

कर्क (शुभ रंग- आकाशी)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

सिंह (शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

कन्या ( शुभ रंग- क्रीम )
शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन एकोपा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधवर लगाम ठेवा. आईच्या अज्ञेत रहा.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी )
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल. काही येणी असतील तर दिवसाच्या उत्तरार्धात वसूल होऊ शकतील.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा)
आज अति उत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवर तरुणांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले गवसेल.

मकर ( शुभ रंग- मोतिया )
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ.

कुंभ (शुभ रंग – केशरी)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांना वेळ देणे आज अवघड होईल.

मीन -(शुभ रंग – जांभळा)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. थोडा मोठ्यांचा मान राखावा लागेल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.