Today’s Horoscope 21 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य 

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

२१.१०.२०२३.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- महालक्ष्मी पूजन

राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वाशाढा १९.५४ पर्यंत नंतर उत्तराशाढा

चंद्र राशी – धनु.
————————————
मेष – ( शुभ रंग- आकाशी )
व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. आपल्या कूवती बाहेर असलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

वृषभ (शुभ रंग- मरून)
आज विश्वासातील माणसांकडूनच विश्वासघात होऊ शकतो. मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकलले तर बरे होईल. आज वैवाहिक जीवनातही थोडेफार मतभेद संभवतात.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज वैवाहिक जोडीदाराबरोबर चांगले सूर जुळतील.

कर्क (शुभ रंग- भगवा )
आज काही मनाविरुद्ध घटना तुमच्या मनाला बेचैन करतील. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषय काढूच नका.

सिंह (शुभ रंग- पांढरा)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही तुम्ही खर्च करू शकाल. गुढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी )
आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे.

तूळ ( शुभ रंग- लाल)
आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा अजिबात करू नये.

वृश्चिक (शुभ रंग- गुलाबी)
आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवे असे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झाड. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.

धनु- (शुभ रंग- हिरवा )
आज तुम्ही फक्त स्वतःचेच खरे न करता इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावध असलेले बरे.

मकर ( शुभ रंग- चंदेरी)
आज संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचार करायची गरज नाही. आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. घराबाहेर वावरताना वाद मात्र टाळा.

कुंभ (शुभ रंग – जांभळा )
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून जे जे चिंताल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

मीन -(शुभ रंग – क्रीम )
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघडच जाईल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.