Traffic News : चांदणी चौकात गर्डर उभारण्यासाठी महामार्गावरील जड वाहतूक तीन तास बंद

एमपीसी न्यूज – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर चांदणी चौक प्रकल्पाच्या (Traffic News) मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीचे काम केले जात आहे. त्यासाठी दररोज रात्री साडेबारा ते साडेतीन या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे.

IIT Delhi in Dubai : अबुधाबी येथे आयआयटी दिल्लीचे पहिले संकुल; सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या

पुणे-मुंबई द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक ठराविक ठिकाणी थांबवली जाणार असल्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिले आहेत.

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे.

या चांदणी चौक प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्यात आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्गावरील अवजड वाहतूक तीन तास थांबवण्यात येणार आहे.

मुंबईकडून येणारी जड वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव टोलनाका येथे व मुंबई-पुणे जुना महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे टोल नाका येथे थांबवली जातील.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्ग येथून चारचाकी हलकी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिज मार्गे व चांदणी चौक विवा हॉटेल या मार्गाने कात्रजकडे जातील.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग व किवळे ब्रिज ते राधा चौक या दरम्यान येणारी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिजमार्गे (Traffic News) जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.