Chakan : चाकणमध्ये एकाच रात्री दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न; एकास अटक

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे (Chakan)असलेले बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर लगेच पाऊण तासात माणिक चौक चाकण येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.

याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या घटना शनिवारी (दि. 15) पहाटे दीड आणि सव्वादोन वाजता घडल्या.

Traffic News : चांदणी चौकात गर्डर उभारण्यासाठी महामार्गावरील जड वाहतूक तीन तास बंद

मोहम्मद सरफराज कलामुद्दिन अन्सारी (वय 26, रा. जमोरही, जि. रोहतास, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

महाराष्ट्र बँक एटीएम प्रकरणी चॅनल मॅनेजर भगवंत मुळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम सेंटर आहे.

शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये आली. त्या व्यक्तीने दगडाने एटीएम मशीनचा चेस्ट डोअर दगडाने फोडले.

त्याच्या आतील बाजूचा पिन कोड असलेला तिजोरीचा दरवाजा त्याला उघडता आला नाही. त्यामुळे तो एटीएम सेंटर मधून निघून गेला.

हा प्रकार एटीएम सेंटर मध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. बँकेच्या नियंत्रण कक्षात असलेल्या कर्मचाऱ्याने याबाबत फिर्यादी यांना माहिती दिली.

फिर्यादी घटनास्थळी आले असता तिथे पोलीस आले होते.

त्यांनतर पहाटे सव्वादोन वाजता इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.

यामध्ये एटीएम मशीनचे कॅश कॅबीनचे पासवर्ड आणि कॅश डिस्पेन्सर तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न झाला.

याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी माणिक चौकात धाव घेतली.

माणिक चौक, चाकण मधून संशयाच्या आधारे मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले.

चाकण पोलीस तपास करीत (Chakan) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.