Tribute through Advertisement: ‘अमूल’ची सुशांतला अनोखी श्रद्धांजली

Tribute through Advertisement: 'Amul's unique advt creative on Sushant 'इक वारि फिर से आ भी जा यारा'असं म्हणत 'अमूल'ने एक कार्टून फोटो पोस्ट केला आहे.

एमपीसी न्यूज – ‘अमूल’ हा ब्रँड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण जाहिरातींमुळे जनमानसात चांगलाच ठसला आहे. ‘अमूल’च्या अनोख्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या जाहिरातीत समावेश होणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. पण अमूलच्या आजच्या जाहिरातीने मात्र चित्रपटप्रेमींचे डोळे नक्कीच पाणावले असतील.  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला त्याच्या लोकप्रिय चित्रपटगीताच्या माध्यमातून अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे.  

‘इक वारि फिर से आ भी जा यारा’असं म्हणत ‘अमूल’ने एक कार्टून फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सुशांतने आजवर साकारलेल्या तीन व्यक्तिरेखा कार्टून फॉर्ममध्ये दिसत आहेत. ‘इक वारि फिर से आ भी जा यारा’ हे सुशांतच्या ‘राबता’ चित्रपटातील गाणं आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘काय पो चे’, ‘एम. एस. धोनी’ आणि ‘सोनचिरीया’ या चित्रपटातील तीन व्यक्तिरेखा या जाहिरातीत दाखवण्यात आल्या आहेत.

नैराश्यात असल्यामुळे सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असं म्हटलं जात आहे. पण एवढ्या गुणी अभिनेत्याला अशी कोणती वेदना सतावत होती याबद्दल आता फक्त तर्क-वितर्कच केले जात आहेत. कारण सुशांतने कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मागे ठेवलेली नाही.

अमूल आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्याचे काम करते. आणि त्याचा उल्लेख आपल्या जाहिरातीत करते. यंदा 2020 या वर्षाच्या स्वागताची जाहिरात देखील लक्षवेधक होती. तसेच क्रिकेटच्या मैदानावरील खेळाडूंचे पराक्रम, कोनेरु हंपीचा विजय, डॉ. श्रीराम लागू यांचे निधन, राजकारणातील महत्त्वाचा विषय यासारख्या अनेक समयोचित जाहिराती हे अमूलचे वैशिष्ट्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.