Pimpri : पूर्ववैमनस्यातून पिंपरीत दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

Violent fighting between two groups in Pimpri ; Filed conflicting charges

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून गांधीनगर, पिंपरी येथे रविवारी (दि. 14) रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी दहा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सतीश पांडूरंग भांडेकर (वय 40) यांनी सोमवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय शिंगाडे (वय 30), विजय शिंगाडे (वय 32), दिनेश शिंगाडे (वय 27), चंद्रकांत शिंगाडे (वय 55, रा. खराळवाडी, पिंपरी) आणि चंद्रकांत जमादार (वय 35, रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांचा भाऊ मुकेश भांडेकर (वय 30) यास लाथाबुक्‍क्‍या व चॉपरने मारून जखमी केले. या मारहाणीत मुकेश यांचे दोन दात पडले आहेत.

तर दिनेश विलास शिंगाडे (वय 29) यांनी याच्या परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी दत्ता भांडेकर (वय 35), सतीश भांडेकर (वय 30), मुकेश भांडेकर (वय 30), आशु भांडेकर (वय 19), अनिकेत भांडेकर (वय 25) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यापैकी आरोपी सतीश, आशु आणि अनिकेत या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हे घराबाहेर बसले होते. आरोपींनी आपसांत संगनमत करून जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी दत्ता भांडेकर याने चॉपरने फिर्यादी दिनेश यांच्यावर वार केले.

आरोपी सतीश याने कोयत्याने वार केले. आरोपी मुकेश याने ब्लेडने गालावर वार केले. आरोपी आशु आणि अनिकेत यांनी लाकडी दांडक्‍याने मारून गंभीर जखमी केले.

दोन्ही गुन्ह्यांचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.