Bhosari Crime News : शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघा सराईतांना अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. गुरुवारी (दि. 10) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली.

बाबा सैफन शेख (वय 25, पिंपळे गुरव), अक्षय अण्णा रणदिवे (वय 27, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 11 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोड, भोसरी येथील बावन्न खोल्याजवळ दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन बाबा शेख आणि अक्षय रणदिवे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत.

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी बाबा शेख याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, जबरी चोरीचे सांगवी पोलीस ठाण्यात पाच, चतुश्रुंगी, शिवाजीनगर आणि कोथरूड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी अक्षय रणदिवे याच्या विरोधात दरोड्याच्या तयारीचा भोसरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

काऊंटडाऊन दहावी! भाग 10 – Tricks to score higher in SSC English Exam – Santosh Khatal. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.