Gas cylinder transport case : धोकादायकपणे गॅस सिलेंडर वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विनापरवाना धोकादायकपणे (Gas cylinder transport case) गॅस सिलेंडरची वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रविवारी (दि. 5) रात्री साडेसात वाजता खेड तालुक्यातील सावरदरी येथे गुन्हे शाखा युनिट तीनने केली.

दत्तराज शिवाजी कुणाळे (वय 40, रा. सावरदरी, ता. खेड), गणेश उर्फ स्वप्नील देविदास गाडे (वय 31, रा. सुदुंब्रे, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार यदु आढारी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याने दोन लाख 99 हजार 250 रुपये किमतीच्या गॅस सिलेंडरच्या टाक्यांची विनापरवाना वाहतूक केली. त्याने गाडीतून उतरवून ते गॅस सिलेंडर आरोपी दत्तराज याला दिले. दत्तराज याने संभाव्य धोक्यापासून सुरक्षितता पाळण्याच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षा न बाळगता गॅस सिलेंडर टाक्या साठवून ठेवल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एका सिलेंडर मधून (Gas cylinder transport case) दुस-या सिलेंडर मध्ये गॅस भरण्याचे साहित्यही जप्त केले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.